Posts

"गुरुपूजन आणि गुरुतत्व"

"गुरुपूजन आणि गुरुतत्व" भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे.  गुरू म्हणजे फक्त व्यक्ती नसून ते एक तत्त्व आहे असे मला वाटते. आपण गुरुपूजनाच्या दिवशी नेहमी एक श्लोक म्हणतो...  "गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।  गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥" ह्या श्लोकाची फोड करता असे लक्षात येते की , ब्रह्मा, विष्णू व महेश हे सर्व गुरुस्थानी आहेत आणि गुरु हा साक्षात परब्रह्म आहे. प्राचीन काळात आपल्याकडे गुरुशिष्य परंपरा आणि गुरुकुल शिक्षण पद्धती होती. काही अंशी ती आजही काही ठिकाणी पाहायला मिळते.  सत्युयुगात प्रभू श्रीराम ह्यांचे महर्षी वशिष्ठ व विश्वामित्र हे गुरू होऊन गेले ज्यांना ब्रह्मर्षि ही म्हणत असत तर द्वापारयुगात महर्षी वेद व्यास, द्रोणाचार्य , कृपाचार्य असे गुरु होऊन गेले. त्याच युगात एका महान व्यक्ती होऊन गेली ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे त्यांच्या लहानपणी सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेत होते. ह्या सर्वांमध्ये गुरुशिष्याचे एक अतिशय सुरेख असे नाते होते. असो, ह्या सर्वांमध्ये..अशी कोण व्यक्ती आहे की जी मला गुरू म्...

कलियुगातील समुद्र मंथन , देशाचे राजकारण आणि सामान्य भारतीय जनता

कलियुगातील समुद्र मंथन , देशाचे राजकारण आणि  सामान्य भारतीय जनता.  आपल्या सर्वांना माहिती आहे की , #अमृतकलश मिळविण्यासाठी देव आणि दानव विष्णू कडे गेले असता विष्णूने त्यांना समुद्र मंथन करण्यास सांगितले. विष्णू म्हणाले की ह्या मंथनातून जे बाहेर येईल ते देव आणि दानव ह्यांनी वाटून घ्यावे. ह्या मंथनाचा संदर्भ घेता, जसे देव आणि दानव ह्यांच्या मध्ये समुद्रमंथन झाले होते तशाच प्रकारचे काहीसे मंथन , आपल्या देशात गेली काही दशके देशातील सरकार आणि विरोधक ह्यांच्यात चालू आहे. ह्यात सामान्य जनता म्हणजे , ज्या पर्वताला नाग गुंडाळला तो पर्वत की तो नाग की ज्या कासावावर तो पर्वत होता हे ज्याने त्याने ठरवावे. अर्थात देव आणि दानव कोण हे सुध्दा जनतेलाच ठरवावे लागणार आहे ,  आणि, मंथनातून जे जे बाहेर येईल त्यातील आपल्या देशाला, समाजाला काय चांगले आणि काय वाईट आहे हे सुध्दा ठरवावे लागणार आहे. समुद्र मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली होती तर कलियुगातील ह्या मंथनातून काय काय बाहेर पडेल हे काही आत्ताच सांगता येणार नाही. अर्थात ह्या मंथनाची सुरुवात २०१४ पासून झालेली आहे असे समजायला हरकत नाही.  का...

भाषा , संवाद एवं स्वबोध

भाषा एक दूसरे के साथ संवाद का माध्यम है । जो भाषा दूसरों को समझ आ जाएं वह भाषा में संवाद करना सहज होता है । सहजता होने से हमें विषय समझना एवं एक दूसरे को विषय समझाना, सरल होता है । एक ही प्रांत के दो नागरिक एक ही भाषा बोले यह विचार जितना सरल, सहज एवं स्वाभाविक है ,  वैसे ही दो निराले प्रांत के नागरिक , एक दूसरे की भाषा निराली होने के पश्चात भी किसी एक ही भाषा में संवाद करे यह विचार भी उतना सरल , सहज एवं स्वाभाविक है ।  स्वतंत्रता से पूर्व कई अनेक वर्षों से हर एक प्रांत में अपनी अपनी भाषा बोली जाती थी। उस समय भी एक प्रांत के नागरिक दूसरे प्रांत में व्यापार करने हेतु यातायात करते थे । उस समय भी तो एक भाषा में संवाद न होना कठिनाइयां उत्पन्न करता होगा । परन्तु , उस समय के लोगों ने उन कठिनाइयांयों को दूर करने का मार्ग निकाला होगा । मेरे अनुसार वह मार्ग एक दूसरे की भाषा को अच्छे ढंग से समझना यही हुआ होगा ।  स्वतंत्रता के पश्चात उस समय के राज्यकर्ताओंने  संविधान में भाषावार प्रांत रचना की ,जिसके कारण महाराष्ट्र में मराठी , कर्नाटक में कन्नडा, गुजरात में गुजराती बंगाल में बं...

इतिहासाचे विकृतीकरण भाग १

#इतिहासाचे_प्रामाणिक_लिखाण करणे आणि #इतिहासाचे_विकृतीकरण थांबविणे ही काळाची गरज आहे.  इतिहास ह्या शब्दाला जितके चांगले वजन आहे तितकीच त्याची खोली आहे आणि तो इतिहास आपण जितका शोधू तेव्हढा तो खोल आहे. इतिहास लिहिताना त्या इतिहासा बद्दल उपलब्ध असलेले संदर्भ तपासले जातात. संदर्भ कोणी लिहिले आहेत (लिहिण्याची योग्यता), किती साली लिहिले आहेत. त्याबद्दलचे कागदोपत्री किती पुरावे उपलब्ध आहेत. त्या पुराव्यांचा काळ काय , एखाद्या महत्त्वाच्या घटनेचा , घटनेमधील व्यक्तींचा, ठिकाणचा संदर्भ हा इतर किती आणि कोणत्या साहित्यामध्ये उपलब्ध आहे ह्यावरून त्या इतिहासातील घटनेबद्दल असलेला खरे पणा ओळखू शकतो. अर्थात , त्याचे खरे पण हा त्या त्या व्यक्तींचा दृष्टीकोन असतो असे सुद्धा खूप जण म्हणतात. पण, लिहिणारा एखादे वाक्य लिहितो आणि वाचणारे त्याचा अगदी सरळ अर्थ घेतीलच असे नाही म्हणून सुध्दा इतिहासाबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असतात आणि जिथे मतप्रवाह तयार होतात तिथे इतिहासाबद्दल इतिहासकारांमध्ये वाद विवाद , भांडणे होताना दिसतात. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्यांना फक्त राजकारण करण्यासाठी इतिहासाचे विकृतीकरण कर...

स्वाभिमानी हिंदू म्हणवून घेण्याची लाज कशाला वाटायची ?

काही दिवसांपूर्वी काही लोकं , मला चौकात बोलत असताना आढळली की नरेंद्र मोदी आहेत तो पर्यंत हिंदूंना कसली काळजी नाही आणि देशाला नरेंद्र मोदींची कशी गरज आहे. तेच हिंदूंना वाचवू शकतात आणि नंतर योगी पण आहेच ,वगैरे वगैरे... मला कळेना मी ह्यावर कसं व्यक्त व्हावं. म्हणजे मोदींबद्दल किंवा योगींबद्दलचा आत्मविश्वास वगैरे ठिक आहे...भाजपाचा हिंदू मतदार असा विचार करतोय हे पण ठीक आहे..परंतु कोणीही हा विचार करत नव्हते की मोदी आणि योगी ह्यांच्यानंतर कोण?  आणि, मग त्यांच्या नंतर अजून कोणी तरी तयार होईलच कदाचित ,पण हिंदूंना वाचवण्याची इच्छाशक्ती, हिम्मत प्रत्येक हिंदू मध्ये का नाही? सगळं काय मोदी आणि त्यांच्या नंतर येणाऱ्याने करायचे का? काय त्यांनीच मक्ता घेतलाय का हिंदूंना सुरक्षित ठेवण्याचा? हे म्हणजे..शिवराय जन्माला यावे पण दुसऱ्याकडे , आमच्याकडे नको...असे झाले. असे किती दिवस चालणार आहे? हिंदू म्हणून आपण अभिमानाने जगणार आहोत की नाही? आपण हिंदू आहोत, सहिष्णू आहोत पण एकीकडे स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचे आणि दुसरी कडे आम्ही कसे सेक्युलर आहोत हे दाखवायचे हे चांगले नाही. जी गोष्ट अभिमानाने मिरवायची ती ल...

संघ_परिचय - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

#संघ_परिचय - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ #RSS  आज विजयादशमी ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ९८ वर्षे पूर्ण होत असून संघ आत ९९ वर्षात पदार्पण करीत आहे.  आपल्या सर्वांना माहिती आहेच की रा. स्व.संघाची स्थापना , १९२५ साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार ह्यांनी नागपूर येथे विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर केली. रा. स्व.संघांचे कार्य हे भारतातील सर्व हिंदू समाजाशी संपर्क , सज्जन शक्तिंचे निर्माण व संघटन , हिंदू समाजाचा सर्वांगीण विकास व उन्नती करणे हे आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास सर्व हिंदू समाजाचे संघटन , संरक्षण आणि संवर्धन करून भारतमातेला परम वैभव प्राप्त करून देणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सर्वात महत्वाचा उद्देश आहे आणि गेले ९८ वर्षे संघ त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. संघाचा इतक्या वर्षात झालेला विस्तार पहायचं झाला तर संघाच्या देशभर जवळ जवळ ३९००० पेक्षा जास्त नियमित शाखा चालू आहेत. ज्या मध्ये किमान १२००० पेक्षा जास्त शाखा ह्या Corona संक्रमण काळात e-shakha म्हणून कार्यरत आहेत. Corona संक्रमणाच्या आधी म्हणजे देशात lockdown होण्यापूर्वी संघाच्या जवळ जवळ ६०००० शाखा प्रत्यक्ष लागत होत्या ज्या आत...

एका इतिहास पुरुषाशी झालेली आभासी भेट....

एका इतिहास पुरुषाशी झालेली आभासी भेट.... बरोबर एक ते दीड वर्षांपूर्वी आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांची भेट घेण्याचे ठरविले होते.  पहिले Lockdown जेव्हा लागले , तेव्हा अचानक एके दिवशी माझ्या मनात विचार आला आणि मी बाबासाहेबांनी लिहिलेल्या राजा शिवछत्रपती ह्या ग्रंथाचा संदर्भ घेऊन छत्रपती शिवरायांवर एक पोथी लिहायला घेतली. लिहीत असताना , मला खूप इच्छा झाली की मी लिहीत असलेल्या काही ओव्या त्यांना कधीतरी समोरासमोर बसून वाचून दाखवाव्यात. माझे लिखाण नियमित चालू होते...एके दिवशी बाबासाहेबांना फोन करायचे ठरविले. मी टिपरे काकांचा फोन नंबर घेतला . प्रतापराव टिपरे काका बाबासाहेबांच्या बरोबर होते तेव्हा त्यांना फोन करून तसे विचारले. कोरोनाची पाहिली लाट संपली होती तर भेटता येईल का ? त्यांनी सांगितले की वयोमानामुळे कोरोनाच्या परिस्थितीत त्यांना भेटणे योग्य नाही. मलाही ते पटले..पण , मनात चलबिचल होत होती. टिपरे काकांनी सांगितले की सध्या त्यांना स्वतःला बरे नसल्यामुळे तेच बाबासाहेबांच्या बरोबर राहत नाहीयेत. पण , काही दिवसांनी प्रयत्न करू असे म्हणाले.  दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळात प्रता...