इतिहासाचे विकृतीकरण भाग १

#इतिहासाचे_प्रामाणिक_लिखाण करणे आणि #इतिहासाचे_विकृतीकरण थांबविणे ही काळाची गरज आहे. 

इतिहास ह्या शब्दाला जितके चांगले वजन आहे तितकीच त्याची खोली आहे आणि तो इतिहास आपण जितका शोधू तेव्हढा तो खोल आहे.

इतिहास लिहिताना त्या इतिहासा बद्दल उपलब्ध असलेले संदर्भ तपासले जातात. संदर्भ कोणी लिहिले आहेत (लिहिण्याची योग्यता), किती साली लिहिले आहेत. त्याबद्दलचे कागदोपत्री किती पुरावे उपलब्ध आहेत. त्या पुराव्यांचा काळ काय , एखाद्या महत्त्वाच्या घटनेचा , घटनेमधील व्यक्तींचा, ठिकाणचा संदर्भ हा इतर किती आणि कोणत्या साहित्यामध्ये उपलब्ध आहे ह्यावरून त्या इतिहासातील घटनेबद्दल असलेला खरे पणा ओळखू शकतो.
अर्थात , त्याचे खरे पण हा त्या त्या व्यक्तींचा दृष्टीकोन असतो असे सुद्धा खूप जण म्हणतात. पण, लिहिणारा एखादे वाक्य लिहितो आणि वाचणारे त्याचा अगदी सरळ अर्थ घेतीलच असे नाही म्हणून सुध्दा इतिहासाबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असतात आणि जिथे मतप्रवाह तयार होतात तिथे इतिहासाबद्दल इतिहासकारांमध्ये वाद विवाद , भांडणे होताना दिसतात.
अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्यांना फक्त राजकारण करण्यासाठी इतिहासाचे विकृतीकरण करण्याची गरज लागते , ते कधीही इतिहासकार नसतात हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. 
इतिहास आणि भूगोल हे एकमेकांशी खूप संलग्न विषय आहेत. तुम्ही नीट अभ्यास केलात तर लक्षात येईल की कुठल्याही देशाचा इतिहास बदलला तर भूगोल सुद्धा आपोआप बदलतो.  आणि इतिहास व भूगोल बदलण्यासाठी युद्ध होतात.
एकोणिसाव्या शतकातील भारत आणि पाकिस्तान ही दोन्हीं राष्ट्र ह्याची उत्तम उदाहरणे आहे.
इतिहास व भूगोल बदलल्यावर त्या त्या राष्ट्राचे अस्तित्वच नष्ट होते. 
प्राचीन इतिहास आपण जपला , वाचला आणि पुढील पिढीला सपूर्त केला तर तो एक संस्कार होतो अन्यथा स्वार्थी राजकारणासाठी त्याचे विकृतीकरण केल्यास तो त्या राष्ट्राचा इतिहासाचा घोर अपमान ठरतो. 

©️ समीर कुलकर्णी 

Comments

Popular posts from this blog

"गुरुपूजन आणि गुरुतत्व"

कलियुगातील समुद्र मंथन , देशाचे राजकारण आणि सामान्य भारतीय जनता