स्वाभिमानी हिंदू म्हणवून घेण्याची लाज कशाला वाटायची ?

काही दिवसांपूर्वी काही लोकं , मला चौकात बोलत असताना आढळली की नरेंद्र मोदी आहेत तो पर्यंत हिंदूंना कसली काळजी नाही आणि देशाला नरेंद्र मोदींची कशी गरज आहे. तेच हिंदूंना वाचवू शकतात आणि नंतर योगी पण आहेच ,वगैरे वगैरे...

मला कळेना मी ह्यावर कसं व्यक्त व्हावं. म्हणजे मोदींबद्दल किंवा योगींबद्दलचा आत्मविश्वास वगैरे ठिक आहे...भाजपाचा हिंदू मतदार असा विचार करतोय हे पण ठीक आहे..परंतु कोणीही हा विचार करत नव्हते की मोदी आणि योगी ह्यांच्यानंतर कोण? 

आणि, मग त्यांच्या नंतर अजून कोणी तरी तयार होईलच कदाचित ,पण हिंदूंना वाचवण्याची इच्छाशक्ती, हिम्मत प्रत्येक हिंदू मध्ये का नाही? सगळं काय मोदी आणि त्यांच्या नंतर येणाऱ्याने करायचे का? काय त्यांनीच मक्ता घेतलाय का हिंदूंना सुरक्षित ठेवण्याचा? हे म्हणजे..शिवराय जन्माला यावे पण दुसऱ्याकडे , आमच्याकडे नको...असे झाले.

असे किती दिवस चालणार आहे? हिंदू म्हणून आपण अभिमानाने जगणार आहोत की नाही? आपण हिंदू आहोत, सहिष्णू आहोत पण एकीकडे स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचे आणि दुसरी कडे आम्ही कसे सेक्युलर आहोत हे दाखवायचे हे चांगले नाही. जी गोष्ट अभिमानाने मिरवायची ती लपवायची कशाला? 

काही हिंदू तर स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायला पण लाजतात आणि स्वतःला पुरोगामी हिंदू म्हणवून घेतात. हिंदू असल्याची लाज कसली बाळगता ? हे कसले दळभद्री लक्षण ?

ह्या पुरोगाम्यांचा दुसरा धंदा म्हणजे...हो धंदाच म्हणायचा की , छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज कसे सेक्युलर होते हे दाखवणे.
..म्हणजे आपले संपूर्ण आयुष्य महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात घालविले , संभाजी महाराजांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले पण आपला हिंदू धर्म बदलला नाही , त्यांना हे पुरोगामी सेक्युलर बनवायचा प्रयत्न करत आहेत? हे कसले फालतू उद्योग ? 

प्रत्येक हिंदूने प्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज , गुरू गोविंदसिंह, महाराणा प्रताप आणि झाशीची राणी , अहिल्याबाई होळकर , राणी यल्लंमा असे अनेक महाप्रतापी हिंदू विर आणि विरांगणा झाल्या म्हणून हिंदूंचे अस्तित्व टिकून आहे. ह्या सर्व राजांनी आणि त्यांच्या काळातील  संतांनी वेळोवेळी भक्ती आणि शक्तीचा संगम करून ह्या सनातन धर्माला वाचवले. जर शिवरायांवर भक्ती असेल तर त्यांच्यासारखी शक्ती , चातुर्य आणि दूरदर्शीपणा सुध्दा अंगी बाळगून आपल्याला आपल्या हिंदू धर्माला जागृत अवस्थेत ठेवले पाहिजे. 
आपण ह्या महापुरुषांची प्रतिमा कायम आपल्या स्मरणात ठेवली पाहिजे. त्यांच्या कार्याचा अभ्यास केला पाहिजे आणि तिथून प्रेरणा घेतली पाहिजे.

©️ समीर कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

"गुरुपूजन आणि गुरुतत्व"

कलियुगातील समुद्र मंथन , देशाचे राजकारण आणि सामान्य भारतीय जनता

इतिहासाचे विकृतीकरण भाग १