स्वाभिमानी हिंदू म्हणवून घेण्याची लाज कशाला वाटायची ?
काही दिवसांपूर्वी काही लोकं , मला चौकात बोलत असताना आढळली की नरेंद्र मोदी आहेत तो पर्यंत हिंदूंना कसली काळजी नाही आणि देशाला नरेंद्र मोदींची कशी गरज आहे. तेच हिंदूंना वाचवू शकतात आणि नंतर योगी पण आहेच ,वगैरे वगैरे... मला कळेना मी ह्यावर कसं व्यक्त व्हावं. म्हणजे मोदींबद्दल किंवा योगींबद्दलचा आत्मविश्वास वगैरे ठिक आहे...भाजपाचा हिंदू मतदार असा विचार करतोय हे पण ठीक आहे..परंतु कोणीही हा विचार करत नव्हते की मोदी आणि योगी ह्यांच्यानंतर कोण? आणि, मग त्यांच्या नंतर अजून कोणी तरी तयार होईलच कदाचित ,पण हिंदूंना वाचवण्याची इच्छाशक्ती, हिम्मत प्रत्येक हिंदू मध्ये का नाही? सगळं काय मोदी आणि त्यांच्या नंतर येणाऱ्याने करायचे का? काय त्यांनीच मक्ता घेतलाय का हिंदूंना सुरक्षित ठेवण्याचा? हे म्हणजे..शिवराय जन्माला यावे पण दुसऱ्याकडे , आमच्याकडे नको...असे झाले. असे किती दिवस चालणार आहे? हिंदू म्हणून आपण अभिमानाने जगणार आहोत की नाही? आपण हिंदू आहोत, सहिष्णू आहोत पण एकीकडे स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचे आणि दुसरी कडे आम्ही कसे सेक्युलर आहोत हे दाखवायचे हे चांगले नाही. जी गोष्ट अभिमानाने मिरवायची ती ल...