संघ_परिचय - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
#संघ_परिचय - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ #RSS
आज विजयादशमी ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ९८ वर्षे पूर्ण होत असून संघ आत ९९ वर्षात पदार्पण करीत आहे.
आपल्या सर्वांना माहिती आहेच की रा. स्व.संघाची स्थापना , १९२५ साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार ह्यांनी नागपूर येथे विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर केली. रा. स्व.संघांचे कार्य हे भारतातील सर्व हिंदू समाजाशी संपर्क , सज्जन शक्तिंचे निर्माण व संघटन , हिंदू समाजाचा सर्वांगीण विकास व उन्नती करणे हे आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास सर्व हिंदू समाजाचे संघटन , संरक्षण आणि संवर्धन करून भारतमातेला परम वैभव प्राप्त करून देणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सर्वात महत्वाचा उद्देश आहे आणि गेले ९८ वर्षे संघ त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे.
संघाचा इतक्या वर्षात झालेला विस्तार पहायचं झाला तर संघाच्या देशभर जवळ जवळ ३९००० पेक्षा जास्त नियमित शाखा चालू आहेत. ज्या मध्ये किमान १२००० पेक्षा जास्त शाखा ह्या Corona संक्रमण काळात e-shakha म्हणून कार्यरत आहेत. Corona संक्रमणाच्या आधी म्हणजे देशात lockdown होण्यापूर्वी संघाच्या जवळ जवळ ६०००० शाखा प्रत्यक्ष लागत होत्या ज्या आता पूर्ववत होत आहेत. आज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाच्या जवळ जवळ ६००० पेक्षा जास्त छोट्या व मोठ्या गावात आणि अनेक शहरात पोहोचला आहे.
बऱ्याच जणांना संघ शाखेत तुम्ही नक्की काय करता हा प्रश्न पडतो. त्यावर "तुम्ही शाखेत या, मग तुम्हाला संघ जवळून पाहायला मिळेल" असे समर्पक उत्तर स्वयंसेवक देतात...पण माहिती साठी ती कशी चालते त्याची थोडक्यात माहिती देतो.
संघाच्या शाखा ही शिशु , बाल , कुमार - तरुण , प्रौढ ह्या वयोगटात लागतात.
ह्यातील काही शाखा ह्या नियमित म्हणजे दररोज सकाळी व संध्याकाळी लागतात तर व्यावसायिकांच्या (IT , Non IT व इतर क्षेत्रात काम करणारे) शाखा ह्या बऱ्याच अंशी साप्ताहिक म्हणजे आठवड्यात एकदा लागतात.
संघाच्या शाखेत दररोज उत्तम व्यायाम प्रकार , विविध योगासने , जे बाहेर कुठल्याही मैदानावर खेळल्या जात नाहीत असे विविध भारतीय खेळ , बौध्दीक , पद्य , अमृतवचन , सुभाषित व प्रार्थना असे घेतल्या जाते.
शारीरिक विभाग व बौद्धिक विभाग हे संघ शाखेचे अतिशय महत्वाचे आयाम आहेत.
संघाच्या शाखेत भगवा ध्वज लावून शाखेला सुरुवात होते. मुख्य शिक्षक सर्वांना नियोजित आज्ञा देतात व त्याप्रमाणे गण शिक्षक व इतर स्वयंसेवक त्याप्रमाणे वागतात. संघाच्या सगळ्या आज्ञा ह्या संस्कृत मध्ये असतात. संघाची प्रार्थना सुद्धा संस्कृत भाषेत आहे.
शाखेचा मुख्य शिक्षक हा विविध वयोगटाचा असतो व शाखेत त्याचे ऐकणे बंधनकारक असते. हा एक अनुशासन प्रक्रियेचा भाग असतो. मुख्य शिक्षक जर बाल असेल तर तरुण स्वयंसेवक हा मुख्य शिक्षकांच्या आज्ञा पाळतो.
प्रत्येक शाखेला एक कार्यवाह सुद्धा असतो जो मुख्यशिक्षक व इतर स्वयंसेवकांवर लक्ष ठेवतो व जिथे गरज असेल तिथे त्यांना मार्गदर्शन करतो.
संघाच्या , संघ दृष्ट्या नियोजनासाठी संघटन कार्यक्षेत्र रचना केलेल्या असतात.
प्रामुख्याने एखाद्या छोट्या लोकवस्ती मध्ये भरणारी शाखा ते नगर , भाग (संघ दृष्ट्या शहराचे विविध भाग) , महानगर (संपूर्ण शहर) अशी विविध संघटनात्मक कार्यक्षेत्रे येतात. पुढे अखिल भारतीय स्तरा पर्यंत अशा प्रकारच्या रचना लावलेल्या असतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघा मध्ये वर्षभरात ६ उत्सव साजरे केले जातात.
१. #वर्षप्रतीपदा - गुढीपाडवा , हिंदू नववर्ष दिन , आद्य सरसंघचालक पूजनीय डॉ. हेडगेवार जन्मतिथी.
२. #हिंदू_सम्राज्य_दिवस - छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस.
३. #गुरू_पौर्णिमा - व्यास पौर्णिमा , भगव्या ध्वजाला गुरू मानून त्या समोर तन , मन आणि धन( समर्पण ) समर्पित करणे.
४. #रक्षा_बंधन - राखी पौर्णिमा , ह्या दिवशी स्वयंसेवकांद्वारे निरनिराळे उपक्रम राबवून , सामाजिक रक्षाबंधन केले जाते. समाजातील भेदभाव मिटवून समानता आणि समरसता ह्याचे स्वरूप कसे असावे हे स्वयंसेवक दर्शवून देतात.
५. #विजयादशमी - राष्ट्रीय स्वयंसेवक स्थापना दिवस. ह्या दिवशी समाजातील अत्याचारांवर समाजातील दुर्जन शक्तींवर संघाच्या सज्जन शक्तीने विजय मिळविण्या साठी शक्ती प्रदर्शन व शिस्तबद्ध संचालन केले जाते. ह्याच दिवशी शस्त्रपूजन सुद्धा होते
६. #मकर_संक्रांत - ह्या दिवशी तिथि नुसार, सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण चालू होते. ह्या संक्रमणाचा समाजात सकारात्मकता येण्या साठी संघात वेगवेगळे स्वयंसेवक आपापल्या घरून धान्य आणून खिचडी पण बनवतात जेणेकरून एकतेचा भाव निर्माण होईल.
प्रत्येक सण एका विशिष्ट गुणवत्तेला सूचित करतो. जसे गुरुपौर्णिमा, स्वयं-विनंती आणि समर्पण, रक्षाबंधन द्वारे सौहार्द आणि समतेचे प्रकटीकरण, विजयादशमी, वर्षा प्रतिपदा आणि हिंदू साम्राज्य दिवस, प्रयत्नांचे प्रबोधन, राष्ट्रवाद आणि आत्म अभिमान, पराभूत मानसिकतेत बदल आणि मकर संक्रांतीद्वारे योग्य दिशा मध्ये योग्य क्रांती आणि संघटनेची भावना निर्माण करणे उत्सवांच्या माध्यमातून स्वकेंद्रित स्वभाव बदलून सामाजिक भान जागृत करणे.
संघाने काही महत्त्वाचे उपक्रम सुध्दा योजिले आहेत ज्यात स्वयंसेवक समाजात जाऊन ह्या गतिविधि व गतिविधि मार्फत चालणारे कार्य समाजाला समजावून सांगतात. समस्त समाजाने सुध्दा मोठ्या संख्येने ह्या गतिविधि समजावून घेऊन समाजकार्याला जोडून घ्यावे अशी संघाची इच्छा आहे.
ह्या गतिविधि म्हणजे :-
१. ग्रामसेवा
२. गो सेवा
३. कुटुंब प्रबोधन
४. सामाजिक समरसता
५. पर्यावरण सुरक्षा
त्याच प्रमाणे , संघ स्वयंसेवकांनी चालू केलेल्या एकूण ५० विविध संस्था आहेत , ज्या समाजाच्या विविध भागात समाजाप्रती कार्यरत आहेत. त्यांची संघटनात्मक कार्यक्षेत्र रचना पण थोड्याफार प्रमाणात संघां प्रमाणेच असते.
ह्या महत्त्वाच्या संस्था म्हणजे :-
१. राष्ट्र सेविका समिती
२. हिंदू स्वयंसेवक संघ
३. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
४. भारतीय मजदुर संघ
५. भारतीय किसान संघ
६. विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान
७. अखिल भारतीय इतिहास संकलन योजना
८. अखिल भारतीय अधिवक्ता परिषद
९. अखिल भारतीय ग्राहक पंचायत
१०. राष्ट्रीय सेवा भारती
११. लघु उद्योग भारती
१२. क्रीडा भारती
१३. आरोग्य भारती
१४. संस्कार भारती
१५. विज्ञान भारती
१६. प्रज्ञा भारती
१७. भारत विकास परिषद
१८. राष्ट्रीय संपादक परिषद
१९. स्वदेशी जागरण मंच
२०. वनवासी कल्याण आश्रम
२१. गीता विद्यालय
२२. सरस्वती शिशु मंदिर
२३. शिशु शिक्षा प्रबंध समिती
२४. नॅशनल मेडीकोज असोसिएशन
२५. भारत प्रकाशन
२६. पांचजन्य
२७. ऑर्गनायझर
२८. राष्ट्रधर्म हिंदी मासिक
२९. स्वदेश हिंदी मासिक
३०. दीनदयाळ शोध संस्थान
३१. अखिल भारतीय शिक्षण मंडळ
३२. मुस्लिम राष्ट्रीय मंच
३३. भारतीय विचार केंद्र
३४. राष्ट्रीय सिख संगत
३५. अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद
३६. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ
३७. वित्त सलाहकार परिषद
३८. सहकार भारती
३९. सामाजिक समरसता मंच
४०. विश्व संवाद केंद्र
४१. दधिची देहदान समिती
४२. हिंदू जागरण मंच
४३. बाबासाहेब आपटे स्मारक समिती
४४. भारतीय विचार केंद्र
४५. विवेकानंद केंद्र
४६. अखिल भारतीय शिक्षण मंडळ
४७. संस्कृत भारती
४८. भारतीय जनसंघ
४९. विश्व हिंदू परिषद
५०. भारतीय जनता पार्टी , इत्यादी आहेत.
आजच्या घडीला , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशातील व जगातील एकमेव सर्वात मोठी स्वतंत्र व स्वायत्त संस्था आहे.
आज , विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ९६ वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या ९६ वर्षात संघ आणि संघाच्या स्वयंसेवकांनी चालू केलेल्या संस्थांचा खूप मोठा वटवृक्ष झाला आहे.
भारतमातेला परमवैभवाच्या शिखरावर घेऊन जाण्याचा जो निर्धार संघाच्या सर्व पूजनीय सरसंघचालकांचा, प्रचारकांचा आणि प्रत्येक स्वयंसेवकांचा आहे तसाच
पंडित दीनदयाळ उपाध्याय ह्यांचा समाजाच्या शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहोचण्याचा म्हणजेच "अंत्योदय" चा जो निर्धार केला होता त्याच मार्गावर संघ आणि ह्या संस्थांची ही वाटचाल चालू आहे...आणि जो पर्यंत आपल्या भारतमातेला परमवैभावाच्या शिखरावर पोहोचवित् नाही तो पर्यंत हे कार्य असेच अविरत चालू राहील.
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम् ,
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् !!
आपण सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@RSS
www.rss.org
©️ समीर कुलकर्णी
Comments
Post a Comment