इतिहासाचे विकृतीकरण भाग २
#इतिहासाचे_विकृतीकरण - भाग २
मी सिनेमाच्या , TV series च्या विरुद्ध नाही. तो वेळोवेळी , वेगवेगळ्या माध्यमांतून दाखवलाय गेला पाहिजे. परंतु , ज्या इतिहासावर तुम्ही सिनेमा काढत असाल...तो इतिहास लिहिताना इतिहासकारांनी (इतिहास संशोधक ,अभ्यासक ) जे संदर्भ वापरले असतील ते सर्व तपासूनच सिनेमा बनवला पाहिजे आणि त्यावर सरकार व इतिहासकार ह्यांच्याकडून तशी रीतसर परवानगी ही मागितली गेली पाहिजे , कारण तो लिहिताना इतिहासा विषयी असलेली आस्था , तो लिहिताना , संशोधन करताना लागलेले कष्ट आणि त्या मागची साधना ह्यांचा मान राखला गेला पाहिजे.
सर्व प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की मनोरंजन वेगळे आहे आणि इतिहास वेगळा आहे.
आपले प्रेक्षकही इतिहास न वाचताच TV आणि सिनेमात/चित्रपटात जे दाखवले आहे तेच खरं समजतात. "स्वराज्य रक्षक संभाजी महाराज" ही series हे त्याचे उत्तम उदाहरण आणि सिनेमांचे तर काही विचारुच नका. जो येतोय तो स्वतःच्या डोक्यातून इतिहास दाखवायचा प्रयत्न करतोय.
सिनेमाच्या किंवा TV series च्या नावाखाली स्वतःचा, स्वार्थी, जातीयवादी, राजकारणी विमर्श (narrative) प्रेक्षकांवर लादायचा प्रयत्न प्रेक्षकांनीच हाणून पाडला पाहिजे. तसं होत नसेल तर ही घाण पुढच्या कितीतरी पिढ्यांपर्यंत पोहचेल आणि लोकं खरा इतिहास नक्की कुठला हा प्रश्न विचारु लागतील.
आणि , हे सुद्धा विचारतील की तुम्हाला येवढं कळत होतं तर तुम्ही काय करत होता...
मी माझे काम ह्या विषयावर लिहून सुरू केलेले आहे. ह्या आधी लिहिलेला इतिहासाचे विकृतीकरण ह्या विषयावरील माझा जुना blog 👇🙏
http://paramvaibhav-bharati.blogspot.com/2021/08/blog-post.html
Comments
Post a Comment