बिंदी, कुंकू आणि....अभिव्यक्ती स्वातंत्र्य

काही पत्रकार काल पासून ओरडत आहेत की भिडे गुरुजींनी एका महिला पत्रकाराचा अपमान केला म्हणून. भिडे गुरुजींनी , त्या महिला पत्रकाराला "आम्ही प्रत्येक स्त्रीला #भारतमाता समजतो, आणि भारतमाता विधवा नाही , त्यामुळे तू आधी कुंकू लावून ये मग मी तुझ्याशी बोलतो" असे म्हणाले ह्यात त्यांनी त्या महिलेला भारत मातेचे स्वरूप आहेस असेच दर्शवले. मग त्यात तिचा अपमान कसा झाला ?
पत्रकारांनी व इतरांनी पण एक गोष्ट लक्षात घेणे सारखी आहे की भारतातील प्रत्येकाला अभिव्यक्ती किंवा विचार स्वातंत्र्य आहे असे मान्य केले तर आदरणीय संभाजी भिडे गुरुजी जे म्हणाले ते चूक आहे असे समजण्याची काहीही गरज नाही, असे मला वाटते.

ह्यावर , लोकांची विविध मतांतरे असू शकतात. पण, जसे कपाळाला कुंकू लावायचे की नाही हा त्या स्त्रीचा खासगी प्रश्न आहे , तसाच कुंकू किंवा बिंदी नसताना त्या स्त्रीला मुलाखत द्यायची की नाही हा पूर्णपणे गुरुजींचा खासगी प्रश्न असू शकत नाही का ? 
बरं, हा प्रश्न फक्त काही पत्रकारांनी उचलून धरला असता तर काही हरकत नाही...पण कपाळावर भले मोठे कुंकू व टिकली लावून सतत पुरोगामी असल्याचा व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा फाडणाऱ्या कम्युनिस्ट पार्टीच्या काही नेत्या पण बोंबाबोंब करत आहेत. किती तो दुटप्पीपणा ? म्हणजे आपला तो बाळ्या अन् दुसऱ्याचे ते कार्ट असं आहे का ? ह्यांना अभिव्यक्ती व विचार स्वातंत्र्य हवे म्हणून बोंबलत फिरायचे आणि गुरुजींनी त्यांचे विचार मांडले तर त्यावर आक्षेप घ्यायचा ? 

बरं, ह्याच महिला आणि पत्रकार इराण मध्ये हिजाब विरूध्द वर जे आंदोलन चालू आहे त्यावर काही बोलणार नाही पण त्याच वेळी कर्नाटक मध्ये हिजाब घालून शाळेत येऊ नये ह्या नियमावर आंदोलन करताना दिसतात. ह्याला म्हणतात selective or yellow journalism / ज्याला नुकतच एक नाव मिळालंय #HMV (His Master's Voice) journalism. म्हणजे ह्यांच्या बोलावत्या धन्याने ह्यांना पाकीट पोहोचविले की ही पिल्लावळ त्यांची वळवळ आणि चळवळ करायला मोकळी होते. 

असो, मी माझी अभिव्यक्ती मांडली आहे , ज्यांना ह्यावर स्वतःची अभिव्यक्ती मांडायची असेल त्यांनी ती मांडून मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद घ्यावा. 

©️ समीर कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

"गुरुपूजन आणि गुरुतत्व"

कलियुगातील समुद्र मंथन , देशाचे राजकारण आणि सामान्य भारतीय जनता

इतिहासाचे विकृतीकरण भाग १